सन 1996 पासून ते 2011 पर्यंत प्राथमिक शिक्षक म्हणून काम केल्यानंतर MPSC स्पर्धा परीक्षा दिली आणि गट शिक्षण अधिकारी म्हणून प्रशासनात प्रथम नेमणूक मिळाली. तेंव्हापासून आजतागायत मी त्याच पदावर काम करीत आहे. सुरुवातीला आम्हाला प्रशासकीय कामाचे प्रशिक्षण देण्यात आले नव्हते त्यामुळे काम करत असताना अनेक अडचणी येत होत्या पण हाताखालच्या अनुभवी कर्मचारी सहकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला. त्यामूळे कधीही कोणाची तक्रार येऊ दिली नाही. एवढ्या कमी काळात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून मला सन 2012 चा संकल्प सखी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यानंतरही सुद्धा कोणत्याही शिक्षकांची अडचण होऊ दिली नाही,कोणाची जाणूनबुजून अडवणूक केली नाही म्हणून विविध शिक्षक संघटनांनी वेळोवेळी माझ्या कामाचे कौतुक केले. सन 2015 e 2018 या काळात निरंतर शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली.त्याचवेळी शिक्षणाधिकारी (निरंतर) या पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला आणि साक्षर भारत योजना अंतर्गत जिल्हाभरातील गावोगावी जाऊन निरक्षरांना साक्षर बनविले आणि जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढविला. आणि अशा प्रकारे शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सक्षमपणे सांभाळला आहे. सन 2019 ते आजतागायत पंचायत समिती औसा या पदावर गट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना पंचायत समिती रेणापूर तालुक्याचा पण अतिरिक्त पदभार सक्षमपणे सांभाळत आहे. या दरम्यान मला Covid सारख्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये खूप नवीन अनुभव मिळाला आहे.म्हणजे Covid मुळे Lockdown झाल्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाकी सर्व कर्मचारी Work From Home करीत असताना मला मात्र मा.तहसीलदार साहेबांनी तालुक्याच्या Covid Care Center ची कॅम्प ऑफिसर म्हणून आणि त्यानंतर मा.जिल्हाधिकारी महोदयांनी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले.आणि मग मी मला कामात पूर्ण झोकून दिले. घरी माझी आजारी एकटी असे,आणि मी मात्र दिवसभर बाहेर Covid कामात असे. Covid पेशंट यांचे समुपदेशन करून त्यांच्या मनातील भीती दूर करणे,त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा समुपदेशन करणे आवश्यक होते.त्याचबरोबर सर्व पेशंट्सना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे,त्यांच्या जेवण आणि चहा आणि नाष्टा यांची व्यवस्था पाहणे,अशी आणि बरीच अनुषंगिक कामे करावी लागली. शिवाय शिक्षण विभाग प्रमुख म्हणून Covid च्या या आपत्ती काळात जिल्हा सीमेवरील चेक पोस्ट वर, राशन दुकानावर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून,contonment zone च्यायाठिकाणी, वार्ड निहाय पेशंट्ससचे समुपदेशन करणे,त्यांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणे, या सर्व कामांसाठी शिक्षकांच्या नियुक्ती करण्याची कसरत करावी लागत होती. त्यात Covid सारख्या भयानक आपत्तीत शिक्षकांच्या अडचणी सोडवून त्याचेही समुपदेशन करावे लागत होते. आणि ही सर्व कामे फक्त एका तालुक्यासाठी नसून माझ्या दोन्ही तालुक्यात करावी लागत होती. दिवसाचे 24 तास पुरत नव्हते. कधी कधी तर मी घरी आल्यावर तिथले लोक फोन करून Covid Center वर आलेल्या अडचणी/ तक्रारी करायचे,मग मी माझ्या सहाय्यक नोडल अधिकारी यांना सोबत घेऊन पुन्हा Covid Center वर परत जावे लागत असे. या दगदगीत एक वर्ष कसे गेले कळाले नाही.याशिवाय माझी विभाग प्रमुख म्हणूनअसलेली कामे,कार्यालयाने सोपवून दिलेली कामे आणि Covid मुळे ऐनवेळी अचानक प्रशासनात आलेली सर्व ऑनलाईन कामे ऑनलाईन मीटिंग, ऑनलाईन शिक्षण,मग तरीही आपला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून Covid Captain चे गट तयार करून त्यांच्या मार्फत गल्लोगल्ली वर्ग सुरू केले. त्यात पुन्हा आमच्या शाळेतील शिक्षकआम्हाला परत द्यावे,म्हणून ग्रामस्थांच्या तक्रारी येत असत, या सर्वांचा प्रचंड असा शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता, बौद्धिक क्षमतेचा कस लागला. त्यातून आणखीन कार्यक्षमता वाढविण्यासाठी मला खूप मदत झाली. आता अजूनही आमच्या शिक्षण विभागाची Covid ची कामे संपलेली नाहीत, आता हळूहळू शाळा सुरू झाल्या आहेत, आता वेगळाच गोंधळ अनुभवतो आहोत,Covid Vaccination साठी शिक्षक पूर्णवेळ उपस्थित ठेवणे,त्यासाठी जनजागृती करणे,नियमित कामासोबत हेही कामे आम्ही करीत आहोत. या दरम्यान आमचे बरेचसे शिक्षक बांधव Covid ला बळी पडले, काही सावरले तर काही घर उघडं टाकून देवाघरी गेले.मृत्यू अगदी जवळून अनुभवता आला.काहींचे नातेवाईक पेशंट डेड बॉडी सुध्दा न्यायला यायचे नाहीत. टेस्ट+ve आली म्हणल्यावर सोबतचे नातेवाईक पुन्हा पेशंटला हातही लावला तयार होत नसत, मग मी आणि माझे सहकारी आम्ही ambulance च्या ड्रायव्हरला मदत करीत होते. मुलं बाळं मागे ठेवून आई वडील निघून गेले,खूप हृदयद्रावक घटना घडल्या आहेत,त्या सर्वातून मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात आणखी जे जे काही सुंदरकरता येईल ते ते मी करण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते.

1. सन 2004 या वर्षीचा साहित्य कलायात्री चा वैजयंतीमाला मदने पुरस्कार.
2. सन 2005 या वर्षी लायन्स क्लब ऑफ उस्मानाबाद तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार.
3. सन 2007 या वर्षी राष्ट्रीय रस्सीखेच खुला गटातून कांस्य पदक.
4. सन 2012 या वर्षी संकल्प सखी मंचच्या वतीने संकल्प सखी पुरस्कार.
5. जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेतून विविध क्रीडा प्रकारात अनेक बक्षिसे मिळाली.
Update Latest App From Play Store and App Store
Update Latest App From Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.fsia
Welcome Fashion Designer "Yashika Tuteja" for the Grand Finale of Mrs India 2021 from Gurugram, Visit her Profile: Yashika Tuteja Fashion Designer
Welcome Fashion Designer "Yashika Tuteja" for the Grand Finale from Gurugram, Visit her Profile: Yashika Tuteja Fashion Designer
Welcome Makeup Artist "Nanda Bhatia" from Udaipur, Rajasthan, You can Visit her Profile at: Nanda Bhatia Makeup Artist
Welcome to Makeup Artist "Nanda Bhatia" from Udaipur, Rajasthan, You can Visit her Profile at: Nanda Bhatia Makeup Artist